अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करत गडचिरोली पोलिसांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. 'एक गाव, एक वाचनालय' या अनोख्या उपक्रमांतर्गत, नुकतेच मौजा जिजगाव येथे ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील तरुणांना मुख्य प्रवाहात येण्याची नवी संधी मिळाली आहे. जनतेच्या सहभागातून साकारलेले ज्ञानमंदिर दिनांक १३/०९/२०२५ रोजी मौजा जिजगाव येथे पार पडले.