"शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण आणि कालबद्ध अंमलबजावणीची गरज – आमदार सत्यजित तांबे" पुणे येथे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांची दुपारी चार वाजता भेट घेऊन आमदार सत्यजित तांबे यांनी शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न मांडले. परदेश अभ्यास दौऱ्याचे अनुदान वाढवणे, शेततळ्यांसाठी सुरक्षेची तरतूद, पिकविमा योजना सुलभ करणे आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत यावर त्यांनी भर दिला. बळीराजाला केवळ आश्वासन नव्हे तर सन्मान, हमीभाव आणि शाश्वत आधार मिळावा यासाठी आपला लढा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.