विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आनंद बुद्ध विहार बाक्टी यांच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य' रुसला पदर मायेचा' या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी या कार्यक्रमाला राजकुमारजी बडोले आमदार तथा माजी मंत्री, मंजुषाताई बारसागडे नगराध्यक्ष नगरपंचायत अर्जुनी, रचनाताई गहाणे, जिल्हा परिषद सदस्य, पुष्पलताताई दृगकर पंचायत समिती सदस्य, सरीताताई राजगिरे सरपंच आदी मान्यवर या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.