उदगीर शहरातील मोकाट कुत्रे अनेकांना चावा घेत असून या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे,आजपर्यंत अनेक शाळकरी मुलांनाही मोकाट कुत्र्याच्या झुंडीने चावा घेतलाय,मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी सातत्याने नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली परंतु प्रशासनाने गांभीर्याने घेत नाही,चौबारा परिसरात कुत्र्याने ओठाचे लचके तोडले याला जबाबदार कोण, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा मोकाट कुत्रे नगरपालिका कार्यालयात सोडू असा इशारा अमित विजयकुमार खंदारे यांनी दिलाय