कामठी तालुक्यात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्यांनी आजनी गादा गावात गोठ्यात बांधलेल्या वासराची शिकार केली त्यामुळे पशुपालकाचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कामठी रहिवासी रोशन यादव यांचा गाईचा गोठा आजनी गादा गावात आहे तेथे त्यांच्या गाई बांधलेल्या असतात. अचानक काल रात्री येथे बांधलेल्या एका वासरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.