सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरी परीक्षा आणि कॅरी ऑनच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थी विद्यापीठाच्या मुख्य गेटवर चढून निदर्शने करत आहेत. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. NSUI ने विद्यापीठ प्रशासनावर विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. सप्लिमेंटरी परीक्षांच्या तारखा आणि कॅरी ऑन धोरणाबाबत स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विद्यापीठ प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. आंदोलनामुळे विद्यापीठ परिसरातील वाहतूकही प्रभावित झाली आहे.