शिरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी सोमवारी दुपारी 1 वाजता दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अनिल पाटील यांनी आरोग्य केंद्रासमोर ठिय्या धरत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.