प्रजावत्सल व न्यायी राज्यकर्त्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळा आज चिखली शहरात मोठ्या उत्साहाने व जल्लोषात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध उपक्रमांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवन येथे राजमाता अहिल्यादेवींची आरती करून आमदार श्वेता महाले यांनी सादर वंदन केले.आणि त्यांच्या आदर्शावर वाटचाल करण्याचा संकल्प दृढ केला.