मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उद्या, शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड पाठिंबा मिळत असून संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे प्रस्थान झाले.