तुम्हीच पोलीस ठाणे हद्दीतील मोरेगाव परिसरात एका सहा वर्षाच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. नमन यादव या सहा वर्षाच्या मुलाला सर्पदंश झाला, त्याला उपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहा वर्षाच्या मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.