मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आता ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला आहे. येवला-लासलगाव मतदार संघातील शेकडो मराठा बांधवांनी आपल्या घरची भाकरी सोबत घेऊन मुंबईकडे प्रस्थान केले. आंदोलनासाठी ही मोहीम सकाळपासूनच सुरू झाली असून, महामार्गावर घोषणांनी आसमंत दणाणून गेला आहे. एक मराठा, लाख मराठा!" या घोषणांनी नाशिक-संभाजीनगर महामार्गावर जोश निर्माण केला असून, जय भवानी, जय शिवाजी, मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आहे, अशा घोषणांनी परिसरात आंदोलकांचा उत्साह चांगलाच वाढलेला दिसून येत