राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तिरोडा येथे आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी भंडारा जिल्ह्याचे शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली.यावेळी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादीचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्यावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.भाजपमध्ये मानसन्मान मिळत नसल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.