सरकारच्या मुसक्या आवडल्याशिवाय सामान्य माणूस मराठा शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गट युवासेना उपसचिव रणजीत बागल यांनी दिला आहे. आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.