अमरावतीच्या गणोजा देवी येथील मंदिरात कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीचे प्रतिरुप अमरावती शहरापासून 25 किमी अंतरावर गणोजा देवी हे गाव असून येथील पेढी नदीच्या काठावरच हे पूर्वमुखी भव्य मंदिर आहे. मंदिराचा घुमट दर्शनीय असून घुमटाच्या दगडांवर कोरीव काम करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात अमरावती जिल्ह्यासह विदर्भ आणि परदेशातील अनेक भाविक श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. अमरावती - देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या