भाजप प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी आज रविवारी दुपारी १२ च्या सुमारास संजय राऊत यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी विचारले की, “संजय राऊत यांचा नागरिकशास्त्राचा अभ्यास कच्चा आहे का? नागरिकशास्त्राच्या परीक्षेत त्यांना शून्य मार्क मिळाले होते का? कारण मुंबईचा महापौर हा बाहेरचा नसून मुंबईचाच नागरिक होतो. मुंबईत मतदानाचा अधिकार ज्याला आहे, त्यालाच महापौर होण्याचा अधिकार आहे. हा मूलभूत अधिकार राऊत विसरले आहेत का?”बन म्हणाले.