राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यानंतर भुजबळांची नाराजी कायम आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरला भुजबळ दोन दिवसांत मुंबई हायकोर्टात आव्हान देणार आहेत. ते याचिका दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष लागले आहे.