सोनी येथे 2021 ते 2025-26 पर्यंत 15 व्या वित्त आयोग आणि सामान्य फंड यामध्ये निधीचा गैरवापर झाला याबाबत दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गोरेगाव पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांना सोनी येथील नागरिकांनी निवेदन दिले. निवेदनात सामान्य फंडातील निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी पंकज चव्हाण, यश पटले, कैलास बिसेन, प्रकाश बघेले आदी गावकरी उपस्थित होते.