. २७ ऑगस्ट : द्राक्ष हंगामाला सुरुवात होत असतानाच निफाड तालुक्यात बोगस व विनापरवाना कीटकनाशके व जैवउत्तेजकांची अवैध विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्हा भरारी पथकाच्या धाडीत तब्बल १ लाख ६९ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून या प्रकरणी तिघांविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.