आज दिनांक सहा स्पटेंबर रोजी सांयकाळी सहा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की कन्नड तालुक्यातील विविध गावांत यंदा डीजे-मुक्त पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या. देवगाव रंगारी येथे आयोजित विसर्जन मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांसह वारकरी आणि मावळ्यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. ढोल-ताशा, हलगी, लेझीम यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका रंगल्या.