चिखली तालुक्यातील सारंगवाडी संग्राहक तलावात करोडोंचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप कोल्हापूरचे अभियंता अरूण हत्ती यांनी आज 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची कामे काढून घ्यावी अन्यथा कोर्टात दाद मागावी लागेल,असा इशारा देखील अरुण हत्ती यांनी दिला आहे.