आज सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास दहिसर विधानसभेतील एक्सर नायतोडी येथे ईद ए मिलाद उन नबीच्या पवित्र दिनानिमित्त मुस्लिम बांधवांकडून जुलूसाचे आयोजन करण्यात आले होते. या जुलूसामध्ये स्थानिक आमदार मनीषा चौधरी देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी दर्ग्यामध्ये जाऊन चादर अर्पण करून प्रार्थना करण्याचा सन्मान लाभला. या प्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र पटेल, दहिसर पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत कदम तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उत्साहाने उपस्थित होते.