यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी 8 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून दुचाकीना आग लावणाऱ्या पाच आरोपींना यशोधरा नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ज्यामध्ये दोन अल्पवयीन बालकांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली आहे.