चिखली मतदारसंघातील सोमठाणा,दिवठाणा येथील अतिवृष्टीमुळे प्रंचड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेत जमीनीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील,तहसीलदार संतोष काकडे आदी उपस्थित होते.