प्रहारचे जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकरी- शेतमजूर हक्क यात्रेस वाशिम जिल्ह्यातील कामरगाव, शेंदुर्जना आढाव शेलुबाजार व कळंबा महाली येथून दिनांक 30 ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या सभेमध्ये शेतकरी व शेतमजुरांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभली होती. दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार शेतकरी व शेतमजूर यांच्या विविध मागण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी ही यात्रा २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत धडकणार आहे.