कोंगजाई गडाच्या विकासासाठी ९३३ लाखांचा निधी : आमदार विक्रम पाचपुते यांची पाहणी 📍 श्रीगोंदा तालुका पोर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव येथील कोंगजाई गडावर आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते कोंगजाई देवीची महाआरती संपन्न झाली. भक्तिभावाने नटलेल्या वातावरणात आमदार पाचपुते यांनी देवीच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली. 0