मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कुमठे येथील साडेबारा एम.एल.डी. क्षमतेच्या मलनिसारण केंद्राची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी केंद्रातील विविध युनिट्सची प्रत्यक्ष माहिती घेतली. यात पंप हाऊस, प्रायमरी युनिट, सिक्वेन्शियल बॅच रिअॅक्टर्स, क्लोरिनेशन रूम तसेच एअर ब्लोअर रूम यांचा समावेश होता. प्रत्येक विभागाची कार्यप्रणाली, कार्यक्षमता व तांत्रिक बाबी यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.