संग्रामपूर तालुक्यातील खळद येथील २४ वर्षीय युवक शेतातुन घरी जात असतांना वान नदीकाठा वरून पाय घसरून नदी पात्रात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबरच्या रात्री घडली तर १२ सप्टेंबर रोजी पातुर्डा येथील पुलाजवळ प्रेत तरंगताना आढळून आले. मृतक युवकाचे नाव विठ्ठल महादेव आमझरे असे आहे. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.