मुंबईतील लालबागचा राजा' यंदा मयूर महलात विराजमान झाला असून आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तुडुंब गर्दीत देखील महिला, पुरुष, अबाल नागरिक, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक दूरवरून येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत. लालबागचा राजा मनभावणे दर्शन घेण्यासाठी हे भाविक पहाटे पासून रांगेत उभे आह