कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी दोन जर्सी गायींची दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. ७) दुपारी किवळे येथील समीर लॉन्सजवळ करण्यात आली.याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश कदम यांनी रविवारी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद गजानन जाधव आणि बाळा पवार अशी आरोपींची नावे आहे.