आष्टी तालुक्यातील जैतापूर शिवारात आज गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीन च्या सुमारास जोरदार पाऊस झाला यावेळी वीज कोसळल्याने 29 बकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली या दुर्घटनेत जनावरांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने दोघे रखलदार मात्र बचावले.. या घटनेची माहिती महसूल आणि पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आली त्यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त आर्थिक संकटात सापडले तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे..