नवापूर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून आपल्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात आज दुपारी तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास 10 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याच्या इशारा देण्यात आला.