ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायला नको पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन गोंदिया जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रित येत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले. तर शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही यावेळी ओबीसी संघटनांनी दिला. तसेच शासनाने काल मराठा समाजाला दिलेल्या जीआरचा यावेळी ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला.