धुळे महापालिकेतील नगरोत्थान योजनेचा ४० लाखांचा निधी प्रभाग क्रमांक १९ ऐवजी प्रभाग १ आणि १८ मध्ये वळवल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक शब्बीर पिंजारी संतप्त झाले आहेत. जामच्या मळा परिसरात पत्रकार परिषदेत त्यांनी खासदार शोभा बच्छाव आणि त्यांच्या सहायक निलेश काटे यांच्यावर गंभीर आरोप केले. पिंजारी म्हणाले, हा निर्णय जनतेचा विश्वासघात असून, पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करून न्याय मिळवण्यासाठी ते शेवटपर्यंत लढणार आहेत.