कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर भागात किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केली. याबाबत आज 25 सप्टेंबर रोजी शहर पोलिसांनी माहिती दिली आहे.