शहर परिसरातील विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अमोल बाळकृष्ण जाधव, सासू विमल बाळकृष्ण जाधव, सासरे बाळकृष्ण श्रीपती जाधव व दिर योगेश बाळकृष्ण जाधव (सर्व रा. शाहूनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत मोहिनी अमोल जाधव (रा. खेड, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. माहेरून तीन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.