आमदार रामदास मसराम यांच्या उपस्थितीत शहराच्या नागरी समस्यांवर आज देसाईगंज नगरपरिषद येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यामध्ये नागरिकांच्या मूलभूत अडचणी, अपूर्ण विकासकामांमुळे होणारा त्रास, समस्या, नागरिकांच्या तक्रारी यासह शहरातील पाणीपुरवठा नियोजन, सांडपाणी नियोजन, कचऱ्याचे असंघटित व्यवस्थापन, अपूर्ण रस्ते, बंद पथदिवे, घरकुल योजनेतील प्रलंबित प्रकरणे आदींसह व विविध विषयांवर चर्चा करून या नागरी समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.