गेल्या 11 महिन्यापासून मानधन न मिळाल्याने साकोली तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक यांनी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले तसेच साकोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना मानधन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करण्याचे निवेदन बुधवार दिनांक 10 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता कार्यालयात दिले निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर टेंभुर्णे हरिभाऊ येळणे अमोल बोपचे सोविदराव हटकर कैलास झोडे अविनाश बोरकर मोतीराम कटरे सोमनाथ पुरामकर व इतर सदस्य उपस्थित होते