चाळीसगाव शहराचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर २६ ऑगस्ट रोजी कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला होता. या गंभीर घटनेनंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी सोमा उर्फ सागर चौधरी याच्यासह हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी अशा तिघांना सापळा रचून अटक केली आहे. दहशत कमी करण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तीनही संशयित आरोपींची कोर्टापर्यंत पायी धिंड काढली आहे.