ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे. आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:00 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाबद्दल गरळ ओकणाऱ्याना सरकारकडून सुरक्षा देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.