पुसद तालुक्यातील सकल बंजारा समाजातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गाचे आरक्षण मिळावे म्हणून दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी अंदाजे 12 वाजताच्या सुमारास विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.