सोलापुरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरूणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केले आणि तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी विजय यादव सरवदे (रा. मोहोळ) यास सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. अभिजित इटकर यांनी गुरुवारी सायं 5 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली. पीडिता ही एका महाविद्यालयात शिकत असताना आधी शिक्षक असणाऱ्या आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या व्हॉटस्अॅपवर मेसेज करायचा आणि तिचा पाठलाग ही करायचा. पळून जाऊन लग्न करू असा तो वारंवार बोलायचा.