नालासोपारा येथे नाल्यात पडून वाहून गेल्याने 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रमेश तिवारी असे मृत व्यक्तीचे नाव असून ते सुरक्षारक्षक म्हणून एका ठिकाणी कार्यरत होते. कामावरून घरी परतत असताना नाल्यात पडून ते वाहून गेले. त्यांचा मृतदेह नालासोपारा डी मार्ट परिसरातील नाल्यात आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र व्यक्त होत आहे.