जिल्ह्यातील कवठळ,वाई , इंझोरी सह विविध गावांमध्ये शेतकऱ्यांचा सर्वात मोठा असलेला सण बैलपोळा दिनांक 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आपले बैल त्यांचा सकाळी आंघोळ घालून त्यांची सजावट केली, तसेच गोडधोड खाऊ घातले. गावातील मुख्य मंदिरामध्ये नेऊन सामूहिकरीत्या पूजा अर्चना करण्यात आल्यानंतर तोरणा खालून बैल नेण्यात येऊन पोळा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी लहान थोर सर्वांनीच मोठ्या उत्साहात बैलपोळ्यात साजरा केला.