वसई विरार महानगरपालिका मुख्यालय येथे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या आदेशाने गणपती विसर्जन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाबाबत आढावा घेण्यात आला पाच सात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या विसर्जनाच्या नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. विसर्जन सुरळीत पार पाडण्याबाबत यावेळी उपस्थितांना सूचना देण्यात आल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सुहास बाचवे, संबंधित अधिकारी उपस्थित होते.