हिंगणघाट तालुक्यात ढग फुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे तालुक्यात जनजीवन अस्तव्यस्त झाला असून याचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात पडला असून अनेक जणांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान यावेळी झाले अनेक ठिकाणी सिमेंटीकरण रोड बनविताना नियोजनाच्या अभावामुळे जलमय परिस्थिती झाली असून व्यापारी दुकानात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर या पाण्यामुळे चांगली तारांबळ नागरिकांची उडली आहे. नदी नाले उंसडी भरून वाहत आहे.