पारडी येथे राष्ट्रीय हरित सेना इको क्लब अंतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध पैलूंच्या माध्यमातून वृक्षदिंडी काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ही वृक्षदिंडी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पारडी येथे काढण्यात आली. या वृक्षदिंडीत स्थानिक पारडी येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता. सोबतच गावकऱ्यांनी देखील टाळ मृदंगासह भजनाच्या व बँड पथकाच्या तालात ही वृक्षदिंडी काढली.