पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या उमरेड-नागपूर महामार्गावरील चांपा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहफुलाच्या दारूची दुचाकीवरुन वाहतूक करणाऱ्या 2 आरोपीस अटक करून आरोपीकडुन दारु व दुचाकी असा एकूण 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली. उमरेड वरुन चांपा -पाचगाव मार्गे नागपूर च्या दिशेने दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापडा रचून चांपा शिवारात अडवून अटक केली कूही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.