मंडणगड बसस्थानकाच्या पाठीमागे झाडाच्या आडोशाला एक युवक बेकायदेशीररीत्या गांजा सारखा अमली पदार्थ सेवन करताना आढळून आला. ही घटना 19 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप सखाराम केंद्रे वैचारिक (रा. घोसाळे मंडळ) हा युवक गांजा सेवन करताना सापडला. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8(c), 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही नोंद 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2.39 वाजता करण्यात आला आहे