यवतमाळ शहरातील दत्त चौक येथे उभी करून ठेवलेली यामाहा दुचाकी 7 ऑगस्ट रोजी च्या दुपारी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. दुचाकीचे मालक रुपेन्द्रकुमार लोखंडे यांनी दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी कुठेही आढळून न आल्याने 5 सप्टेंबर रोजीच्या दुपारी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठत दाखल केलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.