नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेशी असलेल्या रेटपाडा शिवारात शेतकरी वसंत वळवी यांच्या शेतात आश्चर्यकारक घटना घडली. विना इंधन त्यांच्या शेतातील खूप नलिकेतून अचानक पाण्याचे फवारे उडू लागले. ही घटना पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.